Our team

Teamwork makes the dream work

Jalindar Ingavale (Army Ex-Man)

Founder and president Of Zaad Foundation

                  ब्रह्मदेवाने सृष्टीवरती जो निसर्गरूपी  वातानुकूलित AC बसवला होता. तो मनुष्य प्राण्याच्या निष्काळजीपणामुळे खराब होण्याच्या मार्गावरती आहे.तो मनुष्यालाच ठीक करावा लागेल.

Vijay More (Army Ex-Man)

Vice president of zaad foundation

           समुद्रपातळी वाढते आहे, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळतो आहे, पृथ्वीभोवतालचा ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी कमी होत आहे, हवामानात लक्षणीय बदल होत आहेत, पण इथे स्वार्थाची झापडं लावलेल्या अतीहुशार अश्या मानव-प्राण्याला त्याचे काय? जोपर्यंत प्रश्न समोर ‘आ’ वासुन उभा ठाकत नाही, तो पर्यंत त्याचा कश्याला विचार करायचा ? 

Tanaji Patil (Army Ex-Man)

guide of zaad foundation

             मनुष्य कितीही प्रगत झाला तरी आजही त्याचे जीवनमान निसर्गावरच अवलंबुन आहे. निसर्गाच्या छोटासा प्रकोप सुध्दा आपले जीवन हलवुन टाकु शकतो. मनुष्य आजही नैसर्गिक आपत्तींसमोर ठेंगणा आहे, हतबल आहे.

Priyanka Ingavale

Secretary of zaad foundatiom

             निसर्गाचे संवर्धन होणे आवश्यक आहे असे पोटतिडकिने ओरडणाऱ्या चार लोकांची तोंड दाबली जात आहेत. तुम्ही जसे आनंदाने आयुष्य जगलात तसेच आयुष्य जगण्याचा  पुढील पिढीचाही हक्क आहे, हे तुम्ही लक्षात का नाही घेत आहात?

Rajaram Patil

member of zaad foundation

              विकासाची फळे पर्यावरणाचा बळी देऊन चाखायची असतील तर येणार्‍या पिढीला देण्यासाठी काहीच उरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पाऊल उचलावे. गावातील, शहरातील प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. पशू-पक्षी, पाणी याच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे.

Swati Patil

member of zaad foundation

            वेगवेगळे निसर्गमित्र व संस्था पृथ्वीच्या या दुर्दशेबद्दल जगभरात लोकांना अवगत व शिक्षित करण्याचा आप-आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण आता पृथ्वीसमोरील भविष्यातील धोकेच एवढे वाढले आहेत की, जगभरातील सर्व निसर्गमित्र व संस्था एकत्र केल्या तरी देखील सर्व लोकसंख्येला शिक्षित करायला कमी पडतील.

Yashoda Ingavale

member of zaad foundation

           निसर्गाची हानी करत चाललेली ही मानवाची तथाकथित प्रगती पृथ्वीचा कितपत विनाश करेल ?