





ईश्वराने सृष्टीवरती सर्व प्राण्यांना पर्यावरणपूरक असे जे निसर्गरूपी यंत्र बसवले होते त्याचे आता झपाट्याने पतन होत चालले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे मनुष्य प्राण्याचा निष्काळजीपणा व या निसर्गरूपी वातानुकूलित यंत्र चक्राला ठीक करण्याचा मानवापुढे एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे नैसर्गिक संसाधनाचे व जल स्त्रोतांचे ” संवर्धन व संरक्षण ” करून भरपूर प्रमाणात वृक्षारोपण करणे.’ ‘आता अजून खोलवर शास्त्रशुद्ध पद्धतीने सखोल संशोधन करण्याची वेळ आपण यापूर्वीच गमावलेली आहे. कारण पूर्वी आपण ‘पाणी व हवा विकत घ्यावी लागेल‘ हि ‘भविष्यवाणी ‘ ऐकली होती. ती स्तिथी आता प्रत्यक्षात आपल्या समोर रौद्ररूप धारण करून उभी आहे.मनुष्य प्राणी हा अजूनही आपल्या अत्याधुनिक भौतिक सुखसुविधांच्या प्रापंचिक दुनीयेत मग्न आहे.
वैश्नाविकतापमानवाढ, वातावरणातील बदल,दुष्काळ, प्रदूषण, वाढती लोकसंख्या वाढती बेरोजगारी,ताण-तणाव,शारीरिक व्याधी ,रोगराई ई. समस्या वर्तमान काळात अत्यंत गंभीर समस्या बनल्या आहेत.म्हणूनच या समस्यांचे निवारण करायचे असेल तर.निसर्गाशी एकरूप राहणे गरजेचे आहे. यासाठी लोकांनीच एकत्र येऊन हि चळवळ हाती घेणे गरजेचे आहे. असे आमचे ठाम मत आहे.म्हणूनच या चळवळीला पाठबळ देण्यासाठी आम्ही प्रयन्तशील आहोत.
- निसर्ग आपल्याला निरोगी स्वास्थ्य व प्रफुल्ल मनोबल व शांतिदेतो यासाठी माणसाने निसर्गाला समतोल ठेवण्यासाढी झाडे फुले लावावी.
- काही वर्षांपूर्वी झाडे झुडपे मुबलक प्रमाणात होती. त्यामुळे माणसे निरोगी होती . आता झाडे झुडपे राहिली नाहीत. त्याचे प्रमाण फारच कमी आहे, त्या परिणामामुळे अनेक नवं–नवीन रोग निर्माण झाले. त्यांना थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडे लावून जगवावी लागतील.
- सध्याच्या धावपळीच्या युगात आधुनिक जीवनशैली ,वातावरणातील बदल,अत्याधिक कामाचा त्रास इ.कारणांमुळे लोकांच्यामध्ये ताण–तणाव वाढत आहे.ते अनेक रोगांचे बळी पडत आहेत.या समस्या दूर करण्यासाठी झाडे झुडपे लावून उद्यानांची निर्मितीं करणे गरजेचे आहे.
- वृक्ष वल्ली व निसर्ग म्हणजे औषधी आयुर्वेदाचे भांडार आहे. त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
- जीवसृष्टीतील नैसर्गिक साखळीचा समतोल राखावयाचा असल्यास वृक्षांच्या शिवाय पर्याय नाही.
- वैश्वीक तापमानवाढ व अस्वच्छता या समस्या नष्ट करण्यासाठी निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे आहे.
- ब्रह्मदेवाने सृष्टीवरती जो वातानुकूलित AC बसवला होता. तो मनुष्य प्राण्याच्या निष्काळजीपणामुळे खराब होण्याच्या मार्गावरती आहे.तो मनुष्यालाच ठीक करावा लागेल.